Diabetic man objects to potato curry, wife beats him Ahmedabad | बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

अहमदाबाद - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. पती-पत्नीत बटाट्याच्या भाजीवरून वाद झाल्याची अजब घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेवणात केलेली बटाट्याची भाजी नको म्हणून विरोध करणाऱ्या पतीला पत्नीने धोपाटण्याने बेदम मारहाण केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील वासना परिसरात ही घटना घडली आहे. बटाट्याच्या भाजीवरून पतीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षद गोहेल असं या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते मधुमेहग्रस्त आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना आहारात बटाटा खाणे टाळा असा सल्ला त्याला दिला होता. म्हणूनच त्यांनी बटाट्याची भाजी खाण्यास नकार दिल्याचं म्हटलं आहे. 

जेवणासाठी करण्यात आलेली भाजी खाण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात त्यांना पत्नीने बेदम मारहाण केली आहे. तक्रारीनुसार, हर्षद यांना चार मुली आहेत. वासना परिसरातील सोराईनगर परिसरात ते राहतात. त्याची पत्नी तारा गोहेल हिच्याशी त्याचे भांडण झालं. आज रात्री जेवणात काय केलं आहे अशी विचारणा त्यांनी पत्नीला केली. चपाती आणि बटाट्याची भाजी केल्याचं तिने सांगितलं. 

हर्षद यांनी बटाट्याच्या भाजीला विरोध केल्यावर त्यांच्या वाद झाला. संतापलेल्या पत्नीने त्यांना धोपाटण्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केल्यावर त्याच्या कुटुंबातील काहीजण त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि पत्नीच्या तावडीतून सुटका केली. मारहाणीत हर्षद यांच्या खांद्याला दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले

शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य

CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Diabetic man objects to potato curry, wife beats him Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.