CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:30 AM2020-08-11T10:30:34+5:302020-08-11T10:54:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा उद्रेक होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाचा धोका वाढला असून आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात सात लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याला यश देखील आले आहे. विविध चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.

कोरोनाचा उद्रेक होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे.

जगभरात तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संकटात आशेचा किरण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. अद्याप खूप उशीर झालेला नाही. तसेच सर्वच देशांनी कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं आहे.

टेड्रोस यांनी या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या ही दोन कोटीच्या वर गेली असून जवळपास 7,50,000 लोकांचा मृत्यू झाल्याचं देखील सांगितलं.

व्हायरसचा सामना करण्यासाठी कोणतीही नवीन रणनीती नाही. मात्र आपल्यासमोर न्यूझीलंडचं उदाहरण आहे. त्यांनी ज्या पद्दतीने कोरोनावर नियंत्रण मिळवलं ते महत्त्वाचं आहे.

सर्व देशातील नेत्यानी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत आणि नागरिकांनी नवे उपाय स्वीकारून त्यांचं पालन केलं पाहीजं असंही म्हटलं आहे.

न्यूझीलंडमध्ये गेल्या 100 दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. नवीन उपाय करून कोरोनाला रोखता येतं याचं हे उत्तम उदाहरण आहे.

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र योग्य उपाययोजना आणि त्यांच पालन केल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याने आशा वाढल्या आहेत.

कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटना याबाबत सातत्याने मोलाची माहिती देऊन अपडेट देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 45,257 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Read in English