'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:39 AM2020-08-11T11:39:52+5:302020-08-11T11:51:06+5:30

Sushant Singh Rajput Case: भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे.

subramanian swamy claims sushants feet twisted below ankle a if it was broken | 'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

Next

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी आत्महत्या नसून ही हत्या असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच दरम्यान आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी काही दिवसांपूर्वी बिहार पोलीसही मुंबईत आले होते. या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळत आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने नवा दावा केला आहे. 

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे. 'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...' असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. तसेच कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. आर. सी. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत (जसं की तुटल्यासारखा) होता' असं सुब्रमण्यम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारचे मंत्री आणि जेडीयुचे नेते महेश्वर हजारी यांनी एक खळबळजनक आरोप केला होता. महेश्वर हजारी यांनी रियावर गंभीर आरोप करत तिला विषकन्या म्हटलं. तसेच सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. "रिया चक्रवर्ती ही सुशांतसाठी विषकन्या ठरली आहे. सुशांच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत आहे. त्यांची नावं समोर आली पाहिजेत" असं महेश्वर हजारी यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले

शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य

CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान

शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय

Web Title: subramanian swamy claims sushants feet twisted below ankle a if it was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.