congress rahul gandhi slams modi government over eia 2020 draft | "देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

नवी दिल्ली - कोरोना, लॉकडाऊन, भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

EIA2020 उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस थांबवण्यासाठी हा मसुदा मागे घ्यावा असं राहुल यांनी म्हटलं आहे. 'ईआयए 2020 मसुद्याचा उद्देश स्पष्ट आहे, देशाची लूट. देशाच्या साधनसंपत्तीची लूट करणाऱ्या निवडक सुटाबुटातील मित्रांसाठी भाजपा सरकार काय काय करत आली आहे याचं हे आणखी एक भयंकर उदाहरण आहे. देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस रोखण्यासाठी ईआयए 2020 मसुदा मागे घ्यायलाच हवा' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं आणखी एक भयंकर उदाहरण असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी यासोबतच LootOfTheNation हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला होता. 

"जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे" अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली होती. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं काही दिवसांपूर्वी राहुल यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य

CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान

शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय

शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress rahul gandhi slams modi government over eia 2020 draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.