शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:37 AM2020-08-10T08:37:54+5:302020-08-10T08:43:28+5:30

विद्यार्थांनी परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे. याच दरम्यान गुणांसंदर्भात गोंधळ निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे.

haryana girl got 100 out of 100 numbers in 10th exam after revaluation | शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी

शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी

Next

हिसार - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच दरम्यान विविध बोर्डाचे दहावीचे आणि बारावीचे निकाल लागत आहेत. अनेक विद्यार्थांनी या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे. याच दरम्यान गुणांसंदर्भात गोंधळ निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. हरियाणामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी हरियाणा बोर्डाचा दहावीचा निकाल लाiगला आहे. मात्र यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या एका दिव्यांग विद्यार्थिनीला दहावीत गणिताच्या पेपरमध्ये फक्त 2 गुण मिळाले होते. सुप्रिया असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. सुप्रियाला सर्वच विषयात खूप चांगले गुण मिळाले पण गणितात दोन गुण मिळाल्याचं पाहून धक्काच बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया अंध असून तिने दिव्यांग कोट्यातून दहावीची परीक्षा दिली होती. तिला गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले होते. हा निकाल पाहून ती खूप दु:खी झाली होती. सर्व विषयांत जबरदस्त गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीला गणित विषयात फारच कमी गुण कसे पडले असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यामुळेच सुप्रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी गणित या विषयाचा पेपर पुनर्तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. 

पुनर्तपासणीचा आलेला निर्णय पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुप्रियाला गणितात पैकीच्या पैकी म्हणजेच 100 गुण मिळाले. सुप्रियाला सुरुवातीला फक्त दोन गुण मिळाले होते. मात्र नंतर आलेल्या निकालात तब्बल 98 गुण वाढले आणि तिला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले. मात्र या घटनेमुळे अनेकांनी हरियाणा बोर्डाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला

माणुसकीला काळीमा! नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...

बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा 

घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

Web Title: haryana girl got 100 out of 100 numbers in 10th exam after revaluation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.