vehicle rule 15km helmet for bike in india fact check | घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक मेसेज हे वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही असं सांगणारा एक मेसेज वेगाने फिरत आहे. 

सोशल मीडियावर 15 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं नाही असं सांगणारा एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. मात्र याबाबत अधिक तपास केला असता हे खोटं असल्याचं समोर आलं आहे. मेसेजची सत्यता तपासली असता हेल्मेटबाबत व्हायरल होत असलेला हा मेसेज फेक असल्याची माहिती मिळाली आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) नेही हा व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. अंतर कितीही असो हेल्मट घालणं सक्तीचं आहे त्यामुळे अशा खोट्या मेसेजपासून सावध राहा आणि सत्यता पडताळणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सागर कुमार जैन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. जैन यांच्या याचिकेचा हवाला देत व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्मेटचा मेसेज व्हायरल होत आहे. महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांच्या 15 किमीच्या आतमध्ये लोकांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार नसल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. मात्र हा फेक मेसेज असल्याचं आता समोर आलं आहे. 

नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बाईक चालवताना हेल्मेट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्त्वाचं आहे. हेल्मेटबाबतच्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अशी खोटी माहिती पसरवणारे मेसेज इतरांना पाठवू नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vehicle rule 15km helmet for bike in india fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.