CoronaVirus Marathi News 260 students 8 teachers quarantined georgia school | CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

जगातील कोरोनाग्रस्ताचा आकडा दीड कोटीच्या वर गेला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सुरू आहे. तर काही देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं असून तेथील अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र एका देशाने शाळा सुरू केल्या. पण हे करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

अमेरिकेत लॉकडाऊनमध्येही ट्रम्प प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉर्जियाची राजधानी असलेल्या अटलांटामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 11 जणांना कोरोनाची लागण झाली असून तब्बल 268 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. क्वारंटाईनमध्ये 260 विद्यार्थी आणि 8 शिक्षकांचा समावेश आहे. संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्‍यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. 3 ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News 260 students 8 teachers quarantined georgia school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.