"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 09:04 AM2020-08-09T09:04:36+5:302020-08-09T09:15:53+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

congress rahul gandhi slams modi government china vijay mallya file documents | "देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

googlenewsNext

नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं काही दिवसांपूर्वी राहुल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता परत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. 

जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे" अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी आणखी एक ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन करताना अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिसाद दिला. देशात वाढत असलेली असत्याची घाणही साफ करायची आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक सवाल केला आहे.

राहुल गांधी यांनी "का नाही! आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन देशात वाढत चाललेल्या असत्याची घाणही साफ करायची आहे. पंतप्रधान चीनने आक्रमणाविषयीचं सत्य देशाला सांगून या सत्याग्रहाची सुरू करणार का?" असं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत.  मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट राहुल यांनी याआधी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर

Web Title: congress rahul gandhi slams modi government china vijay mallya file documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.