Air India Plane Crash hardeep singh puri reached at kozhikode plane crash site | Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

नवी दिल्ली - कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी (7 ऑगस्ट) रात्री अपघात झाला. मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना विमान अपघातग्रस्त झाले या अपघातात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान दुर्घटनेत मुख्य वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडियात वैमानिक म्हणून रूजू होण्यापूर्वी साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. 

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी अपघात झाला त्या ठिकाणी भेट दिली. संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकारने अपघातग्रस्त प्रवाशांना मदत जाहीर केली आहे. हरदीपसिंह पुरी यांनी या घटनेचा तपास करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. यासोबतच मदतीची घोषणा केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत करण्यात येणार आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना 2 लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. 

हरदीपसिंह पुरी यांनी अपघातातील किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली आहे. अशा घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी ही घेण्यात येणार आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयातील सूत्रांनुसार हे विमान मुसळधार पावसातही सुखरूपणे जमिनीवर उतरले.पण नंतर टर्मिनलच्या दिशेने धावत असताना ते धावपट्टीवरून घसरले व बाजूला असलेल्या खोल खड्डयात पडून त्याचे दोन तुकडे झाले. 

संचालनालयाने मदत व बचाव कार्याची व्यवस्था करण्यासोबतच या घटनेच्या चौकशीचाही आदेश दिला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रौढ प्रवासी, 10 तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण 190 जण होते. कोझिकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी

"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"

Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Air India Plane Crash hardeep singh puri reached at kozhikode plane crash site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.