unnao mp sakshi maharaj threatened with call from pakistan | "10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

उन्नाव - उत्तर प्रदेशच्या उन्नाव मतदार संघातील खासदार आणि भाजपचे नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. साक्षी महाराजांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार करून धमकीला गंभीरतेने घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच साक्षी महाराज यांनी आपल्या तक्रारीत आपल्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी महाराज यांना सोमवारी एका पाकिस्तानी क्रमांकावरून फोन आला. 'आमचा मित्र मोहम्मद गफ्फार याला पकडून तुम्ही आपल्या मृत्यूला निमंत्रण दिल्याचं' धमकी देणाऱ्याने म्हटल्याचं साक्षी महाराजांनी सांगितलं आहे. '10 दिवसांच्या आता तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू. मी आणि माझे मुजाहिद्दीन तुमच्यावर 24 तास नजर ठेवून आहेत. ज्या दिवशी संधी मिळेल तुम्हाला तुमच्या देवाकडे पाठवू. आमच्याकडे तुमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आहे' असंही धमकी देणाऱ्याने आपल्याला म्हटल्याचं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे. 

साक्षी महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माणासंबंधी 'अयोध्या तुर्की बनेल. पुन्हा एकदा बाबरी मशीद उभी राहील. काश्मीर लवकरच पाकिस्तान बनेल. गजवा - ए - हिंद होणार' असं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. 

धमकीचा फोन आल्यानंतर आपण अत्यंत भयभीत झाल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी दहशतवादी संघटनांकडून अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. कुवैतवरून मोहम्मद गफ्फारने फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गफ्फारला उत्तर प्रदेश एटीएसननं बिजनौरहून अटक केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: unnao mp sakshi maharaj threatened with call from pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.