शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आग लागली, बसचा मेन दरवाजा लॉक होता, खिडकी तोडली; जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:58 IST

जयपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडक झाली असून मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजीच्या ट्रकची भीषण धडक होऊन अपघात झाला. यामुळे मोठी  आग लागली,या आगीत ४० हून अधिक गाड्या सापडल्या. यात प्रवाशांनी भरलेली एक बस सापडली. या बसला आग लागली. या आगीत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या बसमधील एका प्रत्यक्षदर्शीने सर्व आपबिती सांगितली आहे. 

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...

जयपूरमधील मान सिंह रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३७ जण जखमी झाले. या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवासी सुनील यांनी सांगितले की, "आम्ही राजसमंदहून जयपूरला येत होतो. अचानक आमच्या बसजवळ स्फोट झाला. आमच्या आजूबाजूला आग लागली होती आणि बसमध्येही आग लागली होती.

सुनील म्हणाले की, आग लागल्याचे समजल्यानंतर आम्ही वाचण्यासठी बसचा मेन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा लॉक होता. यानंतर आम्ही खिडकी तोडून बाहेर आलो. आमच्यासोबत आणखी ८ ते १० लोक बाहेर आले. काही लोक आतच राहिले तर काही जणांचा मृत्यू झाला.

आगीच्या घटनेबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, "सुमारे ४० गाड्या आगीत अडकल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि आता फक्त १-२ वाहने उरली असून या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानमधून जाणाऱ्या जयपूर-अजमेर महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०-२२ गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र अडीच तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकली नाही. यावरून हा अपघात किती भीषण झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. दोन्ही ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, अनेक वाहनांना त्याचा फटका बसला. महामार्गाच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात ही आग दिसत होती.

टॅग्स :Accidentअपघात