शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोव्हॅक्सिनच्या प्राणी चाचण्या यशस्वी, लसीने मजबूत प्रतिकार शक्ती विकसित केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:26 AM

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लस देण्यात आलेल्या प्राण्यांत मजबूत प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली : तेलंगणास्थित भारत बायोटेक इंडिया लिमिटेड (बीबीएल) या कंपनीने विकसित केलेल्या कोरोना विरोधातील कोव्हॅक्सिन लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या प्रचंड यशस्वी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लसीने मजबूत प्रतिकार शक्ती विकसित केल्याचे कंपनीने म्हटले आहे.कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लस देण्यात आलेल्या प्राण्यांत मजबूत प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचे आढळून आले आहे. लस दिलेल्या प्राण्यांना सार्स-कोव-२ विषाणूंच्या संपर्कात ठेवले गेले. तथापि, त्यांना लागण झाल्याचे आढळून आले नाही. भारत बायोटेकने म्हटले की, ही लस २० ºिहसस माकडांना देण्यात आली होती. सार्स-कोव्ह-२ चे अकार्यरत विषाणूंपासून बनविलेल्या लसीचे प्रत्येकी २ डोस या माकडांना देण्यात आले. पहिल्या डोसनंतर १४ व्या दिवशी दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर माकडांना विषाणूंच्या संपर्कात आणले गेले. नंतर त्यांच्या नाकाची पोकळी, घसा आणि फुफ्फुसाच्या उतींची तपासणी केली. त्यांच्यात विषाणूंच्या पुनरावृत्तीचे प्रमाण अत्यल्प आढळले.कोव्हॅक्सिन म्हणजे काय?कोव्हॅक्सिन ही अकार्यरत (इनअ‍ॅक्टिव्ह) लस आहे. यात कोविड-१९ चे मृत विषाणूंचे कण वापरले जातात. मृत असल्यामुळे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, शरीर त्याला प्रतिकार करून अँटिबॉडीज तयार करते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या