शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या बँक लिकिंगमुळे विद्यार्थी उपाशी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

जिल्ह्यातील अनेक शाळांना गॅस सिलिंडर मिळण्यास अडचण

जिल्ह्यातील अनेक शाळांना गॅस सिलिंडर मिळण्यास अडचण
पुणे: गॅस एजन्सी व बँक यांच्या भोंगळा कारभारामुळे गॅस सिलिंडर बँक लिकिंग करण्यात प्रचंड अडचणी येत असून, याचा फाटका जिल्ह्यातील हजारो शाळांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिजवणे कठीण झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष महेश बढे यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यात १ जानेवारी पासून डीबीटीएल योजना लागू झाली आहे. यामुळे सर्व गॅस ग्राहकांनी आपला गॅस सिलिंडर कार्ड संबंधित गॅस एजन्सीच्या माध्यमातून बँक खात्यांशी लिकिं करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात २४ लाख गॅस ग्राहक असून, आता पर्यंत १४ लाख गॅस ग्राहकांनी बँक लिकिंक गेले आहे. अद्यापही १० लाख गॅस ग्रहकांचे बँक लिकिंग झाले नाही. यामुळे जिल्हाधिका-यांनी जानेवारी अखेर पर्यंत गॅस सिलिंडरचे बँक लिकिंग करा अथना गॅसचा पुरवठा बंद करु असे आदेश दिले आहेत. परंतु याच आदेशाचा फायदा घेऊन काही गॅस एजन्सीने गॅस सिलिंडर देण्यास नकार देत आहेत. दरम्यान गॅस एजन्सी व बँकाच्या भोंगळ कारभारामुळे बँक खाते क्रमांक देऊन देखील लिकिंग होत नसल्याने अनेक ग्राहकांना यांचा फटका बसत आहे.
जिल्ह्यातील साडे साडे चार हजार पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान भोजनामध्ये देण्यात येणारा पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यातील काही गॅस सिलिंडर थेट शाळांच्या म्हणजे मुख्याध्यापकांच्या नावाने आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचयातींच्या नावावर शाळांसाठी गॅस सिलिंडर देण्यात येतो. तसेच विद्यार्थ्याची संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये महिन्याला दोन गॅस सिलिंडर लागतात. याबाबत बढे यांनी सांगितले की, जिल्ह्यात डीबीटीएल योजना लागू झाल्याने अनेक शाळांना गॅस सिलिंडर मिळण्यास अडचण येत आहे. काही गॅस एजन्सीमध्ये बँक खाते क्रमांक दिले तरी आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु शाळांच्या नावांवर गॅस असल्याने त्यांचे आधार कार्ड नाही. तसेच बँक खाते क्रमांक देऊन देखील लिकिंग होत नसल्याने याचा फटका शाळांना बसत आहे. त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यास अडचणी येत आहेत.