शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सत्यकथनासाठी सोनिया स्वत:च लिहिणार पुस्तक

By admin | Updated: August 1, 2014 04:30 IST

माझी कहाणी मीच शब्दबद्ध करणार असून, त्या पुस्तकातून सत्य बाहेर येईलच, या शब्दांत गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी विदेशमंत्री नटवर सिंग यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : माझी कहाणी मीच शब्दबद्ध करणार असून, त्या पुस्तकातून सत्य बाहेर येईलच, या शब्दांत गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी विदेशमंत्री नटवर सिंग यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.मी स्वत: पुस्तक लिहीन तेव्हा तुम्हाला सर्व बाबी कळतील. सत्य बाहेर येण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. मी त्याबाबत गंभीर असून, निश्चितच लिहिणार आहे, असे त्यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांना सांगितले. नटवर सिंग यांनी आत्मचरित्रात २००४मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार देण्यामागच्या कारणांचा तपशील दिला आहे. नटवर सिंग यांच्या लिहिण्याने मला धक्का पोहोचलेला नाही. अशा बाबींचे मला वाईट वाटत नाही. मी याहीपेक्षा वाईट बघितले आहे. पती राजीव गांधी यांची स्फोटात तर सासू इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा संदर्भ त्यांनी दिला. हे मार्केटिंगचे तंत्र - डॉ. मनमोहन सिंगकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयातून फायली जात होत्या, हा नटवर सिंग यांनी केलेला आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावला. नटवर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेले विधान म्हणजे येऊ घातलेल्या पुस्तकाचे मार्केटिंग आहे, असेही ते म्हणाले. तत्कालीन प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान कार्यालयासंबंधी निर्णय सोनिया गांधीच घेत असत असा दावा केला होता. त्यालाही उत्तर देण्याची संधी डॉ. मनमोहन सिंग यांनी साधली. आपल्या पुस्तकांचे मार्केटिंग करण्याची ही या लोकांची पद्धत आहे, असा टोला त्यांनी लगावला. संजय बारू यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असे संबोधले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)