शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:57 IST

एका शाळेत परीक्षेदरम्यान सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका शाळेत परीक्षेदरम्यान सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मोंट फोर्ट इंटर कॉलेजमध्ये परीक्षा देत असताना अमेय सिंह (१२) हा सहावीत शिकणारा विद्यार्थी अचानक खाली कोसळला. अमेयला न्यूरोलॉजिकल आजार होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

जानकीपुरम येथील रहिवासी अमेय सिंह (१२) हा इंग्रजीची परीक्षा देऊन आपल्या डेस्कवर परतत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो बेशुद्ध पडला. या घटनेने शाळा प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला. महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं की, परीक्षा सकाळी ८ वाजता सुरू झाली होती. अमेयने अडीच तास पेपर लिहिला, पाणी प्यायला, पेपर दिला आणि खाली पडला. शिक्षकांनी ताबडतोब त्याला मदत केली. शाळेत सीपीआर दिला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याची प्रकृती पाहून शाळा प्रशासनाने त्याला भाऊराव देवरस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं.

रुग्णालयातील डॉक्टरांनी बराच वेळ सीपीआर दिला, परंतु अमेयने कोणतीही हालचाल केली नाही. बीआरडी मेट्रोपॉलिटन हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित दीक्षित यांनी सांगितलं की, मुलाला सकाळी ११:०५ वाजता बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आलं. इमर्जन्सी टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ११:२९ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. म्हणजेच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

महानगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अखिलेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वडिलांच्या विनंतीवरून पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला आणि मृतदेह कुटुंबाला सोपवला. मुलाचे वडील संदीप सिंह यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. अमेयच्या अचानक मृत्यूने शाळा, कुटुंब आणि संपूर्ण कॉलनीला मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Sixth-grader Dies Suddenly During Exam in Lucknow School

Web Summary : A sixth-grade student in Lucknow died suddenly during an exam. Amey Singh, 12, collapsed at Mont Fort Inter College. He had a neurological condition. Despite CPR attempts at the school and hospital, he was declared dead. The family declined an autopsy, shocked by the sudden loss.
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीUttar Pradeshउत्तर प्रदेशTeacherशिक्षकexamपरीक्षा