IPL 2026 PBKS vs DC Delhi Capitals beat Punjab Kings by 3-wickets : पंजाब किंग्सविरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत कर्णधार अक्षर पटेलसह किलर मिलरची अर्धशतकी खेळी आणि माधव तिवारीची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने दमदार विजय नोंदवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्यच्या अर्धशतकाच्या जोरावर धरमशालाच्या मैदानात पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकात २१० धावा करत दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयासह दिल्लीनं प्लेऑफ्सची आस कायम ठेवली. दुसरीकडे पराभवामुळे पंजाबच्या संघाने 'नंबर वन' होण्याची संधी गमावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'बापू'ची क्रांती; किलर मिलरनंही काढला राग अन्...
टीम इंडियातील 'बापू' अर्थात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलपंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघात पाच मोठ्या बदलासह मैदानात उतरला होता. अष्टपैलू माधव तिवारीवर त्याने खेळलेला डाव यशस्वी ठरला. मध्यप्रदेशच्या युवा भारतीय अनकॅप्ड खेळाडूने अष्टपैलू कामगिरीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वत: गोलंदाजी न करता अक्षर पटेल याने पंजाब विरुद्ध फलंदाजीतील ताकद दाखवून देताना उपयुक्त अर्धशतक झळकावले. त्याच्याशिवाय यंदाच्या हंगामात बहुतांश सामन्यात बाकावर बसवल्याचा राग काढताना डेविड मिलरनंही अर्धशतकी खेळी साकारली.
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्यनं ३३ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची धमाकेदार खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं ३६ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी करताना ५ चौकार आणि ३ षटकार मारले. कूपर कॉलॉनी २७ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर अखेरच्या षटकात सूर्यांश शेडगे याने ८ चेंडूत केलेल्या नाबाद २१ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २१० धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून माधव तिवारी आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी २-२ तर मुकेश कुमारनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
अक्षर पटेल- डेविड मिलरची आश्वासक खेळी
पंजाब किंग्सने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. अभिषेक पोरेल ५ (६) आणि लोकेश राहुल ९ (८) सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. साहिल पारख ६ चेंडूत १३ धावा करून परतल्यावर ट्रिस्टन स्टब्स १२ धावांवर बाद झाला. ४ बाद ७४ अशी बिकट अवस्था झाली असताना अक्षर पटेल आणि डेविड मिलर जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलनं ३० चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. मिलरनं २८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या.
अखेरच्या षटकात माधव तिवारीचा जलवा
अखेरच्या षटकात आशुतोष शर्मानं १० चेंडूत २४ धावांची धमाकेदार खेळी केली. IPL मध्ये यंदाच्या हंगामातील पहिला आणि करिअरमधील दुसरा सामना खेळणाऱ्या माधव तिवारी याने ८ चेंडूत नाबाद १८ धावांसह ऑकिब नबीनं २ चेंडूत केलेल्या नाबाद १० धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने १९ व्या षटकात ३ विकेट राखून विजय निश्चित केला. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ तर बेन ड्वॉरशुइस आणि मार्क स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाबच्या संघाने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावेळी चुका केल्या. त्याचा पुन्हा एकदा संघाला मोठा फटका बसला आहे.
Web Summary : Delhi Capitals defeated Punjab Kings thanks to Axar Patel and Miller's fifties. Punjab set a target of 211, but Delhi chased it down, keeping their playoff hopes alive. This loss cost Punjab the chance to be number one.
Web Summary : अक्षर पटेल और मिलर के अर्धशतकों की बदौलत दिल्ली कैपिटल्स ने पंजाब किंग्स को हराया। पंजाब ने 211 का लक्ष्य रखा, जिसे दिल्ली ने हासिल कर लिया, जिससे उनकी प्लेऑफ की उम्मीदें जिंदा हो गईं। इस हार से पंजाब को नंबर एक बनने का मौका गंवाना पड़ा।