Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा

काय आहे नेमकं प्रकरण? जर्मन मॉडेलला कुणी दिली होती ऑफर?

By सुशांत जाधव | Updated: May 11, 2026 23:31 IST

Open in App

ज्या जर्मन मॉडेलवर किंग कोहली फिदा झाल्याची चर्चा रंगली त्या लिजलैज (LizLaz) हिने भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली याच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. विराट कोहलीविरोधात नकारात्मक वक्तव्य करण्यासह खोटे आरोप करण्यासाठी काही माध्यमांकडून मोठ्या पैशांची ऑफर मिळाल्याचा दावा तिने केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराटमुळे चर्चेत आलेल्या 'त्या' जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा

आयपीएलदरम्यान विराट कोहलीने जर्मन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर लिजलैज (Lizlaj) हिचा फोटो लाईक केल्याच्या गोष्टीचा चांगलाच गाजावाजा झाला होता. त्यानंतर विराट कोहलीनं 'अनलाईक'चा पर्याय निवडत विषय संपवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले होते. आता या मुद्यावरून जर्मन लिजलैज हिने धक्कादायक दावा केला आहे. भारतातील काही मासिकांकडून आणि पत्रकारांकडून विराट कोहलीबद्दल वाईट बोलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी पैशांची ऑफरही देण्यात आली होती. मी त्याला साफ नकार दिला, असे तिने म्हटले आहे. 

आधी विराट कोहलीने फोटो लाईक केला, आता जर्मन मॉडेल म्हणते- "मला त्याच्यासाठी..."

पैशांसाठी मी त्याच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, ती म्हणाली, " विराट कोहलीनं फोटो लाईक केल्याचे समजल्यावर मी खूप आनंदी आणि थोडी भावूक झाले होते. पण अशी गोष्ट घडेल, याची कल्पनाही नव्हती. वेगवेगळ्या मासिकांकडून मला फोन येत होते. काही पत्रकारांनी विराट कोहलीबद्दल वाईट बोलण्यासाठी आणि त्याच्यावर उगाच आरोप करण्यासाठी मला पैसे ऑफर केले. पण मी असं का करू? तो माझा आवडता क्रिकेटपटू आहे. पैशांसाठी मी त्याच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही."

RCB च्या जर्सीतील खास फोटो शेअर करत ती लक्षवेधी ठरली

 लिजलैज  हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची जर्सी परिधान केलेले काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. रायपूरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी तिने RCB ला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट करतही ती चर्चेत आली होती. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : German model claims offer to defame Virat Kohli with money.

Web Summary : German model Lizlaj claims she was offered money to make false accusations and negative statements against Virat Kohli by Indian media outlets. She refused the offer, stating she admires Kohli and would not speak falsely about him for money, despite the pressure.
टॅग्स :विराट कोहलीव्हायरल फोटोज्ऑफ द फिल्ड