आधी विराट कोहलीने फोटो लाईक केला, आता जर्मन मॉडेल म्हणते- "मला त्याच्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:44 IST2026-04-18T10:42:38+5:302026-04-18T10:44:51+5:30
विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलैज (Lizlaj) हिचा फोटो लाईक केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व प्रकरणावर आता स्वतः लिजलैजने मौन सोडले आहे.

आधी विराट कोहलीने फोटो लाईक केला, आता जर्मन मॉडेल म्हणते- "मला त्याच्यासाठी..."
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या IPL मध्ये आपल्या फलंदाजीने मैदान गाजवत आहे. मात्र सध्या एका प्रकरणामुळे विराट कोहलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने अवनीत कौरचा फोटो लाईक केला होता, ज्यावर विराटने तांत्रिक बिघाड आणि अल्गोरिदमची अडचण असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलैज (Lizlaj) हिचा फोटो लाईक केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व प्रकरणावर आता स्वतः लिजलैजने मौन सोडले आहे.
बातमी वाचल्यावर कळाले की...
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना लिजलैजने सांगितले की, विराटने तिचा फोटो लाईक केल्याची गोष्ट तिला स्वतःलाही माहित नव्हती. ती म्हणाली, "ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती. मी सकाळी झोपेतून उठले तेव्हा माझ्या बातम्या सगळीकडे होत्या. विराटने फोटो कधी लाईक केला हे मला माहित नव्हते, मला बातम्यांमधूनच हे सर्व समजले. अनेकांनी मला मेसेज केले आणि माझ्या DM मध्ये याबद्दलचे आर्टिकल पाठवले. लोक या गोष्टीमुळे खूप उत्साही होते."
विराटने फोटो लाईक केल्यानंतर काही वेळातच तो 'अनलाईक' केला. यावर लिजलैज म्हणाली, "खरं सांगायचं तर मला त्याच्यासाठी थोडं वाईट वाटलं! त्याने फोटो लाईक केला याचा मला आनंदच होता, पण नंतर त्याने तो अनलाईक केला. ही गोष्ट इतकी मोठी बातमी कशी बनू शकते आणि लोकांनी इतक्या लवकर हे कसं नोटीस केलं, हेच मला समजलं नाही. कदाचित त्याचा तसा कोणताही हेतू नसेल, तरीही त्याने दिलेल्या सपोर्टबद्दल मी त्याची आभारी आहे."
कोण आहे ही लिजलैज?
लिजलैज ही एक जर्मन-दक्षिण आफ्रिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि मॉडेल आहे. ती उत्तम गायिका असून ट्रॅव्हल व्लॉग्सही बनवते. विशेष म्हणजे, तिला भारतीय संस्कृतीबद्दल आकर्षण आहे. गेल्या वर्षी जेव्हा ती भारतात आली होती, तेव्हापासून ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची चाहती बनली आहे. तिने हरियाणातील एका लग्नात हजेरी लावल्याचे व्हिडिओ देखील शेअर केले होते. इंस्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.