'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:25 PM2021-09-21T20:25:33+5:302021-09-21T20:28:49+5:30

Jammu-Kashmir: 'केंद्र सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे.'

'Sikh Khalistani, muslim Pakistanis and only BJP is Hindustani', criticism of mehbooba mufti | 'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

Next

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हिंदू-मुस्लीमात फुट पाडत असल्याचा आरोप केला आहे. 'नेहरू, वाजपेयी सारख्या नेत्यांची जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण, हे आताचं सरकार फक्त हिंदू-मुस्लीमात फुट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, या भाजप सरकारसाठी आता सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालोत आणि फक्त भाजप हिंदुस्थानी आहे. हे सरकार फक्त नावं बदलन्याचं काम करत आहे. पण, नावं बदलल्याने काही होणार नाही. शहरांची नावे बदलली, अनेक शाळांना हुतात्म्यांची नावे दिली जात आहे. पण, शाळांची नावं बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार तालिबान आणि अफगाणिस्तानबद्दल बोलतात पण आपल्या देशातील शेतकरी आणि बेरोजगारीबद्दल कधीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

पीडीपी निवडणूक लढवणार
मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी घोषणा आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पीडीपी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण, 2018 मध्ये सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला. 

Web Title: 'Sikh Khalistani, muslim Pakistanis and only BJP is Hindustani', criticism of mehbooba mufti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.