भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30

भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती - लक्ष्मीकांत पट्टेबहादूरऔरंगाबाद : बुद्ध तत्त्वज्ञानातील महिला सुजाता दरवर्षी वटवृक्ष देवतेला भोजनदान देत असे. ...

Siddhartha receives divine knowledge from food | भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती

भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती

>भोजनदानातून सिद्धार्थास दिव्य ज्ञान प्राप्ती
- लक्ष्मीकांत पट्टेबहादूर
औरंगाबाद : बुद्ध तत्त्वज्ञानातील महिला सुजाता दरवर्षी वटवृक्ष देवतेला भोजनदान देत असे. वन देवता समजून तिने सिद्धार्थ गौतमाला भोजनदानासह खीरदान दिले. या मधूनच सिद्धार्थ गौतमाला दिव्यज्ञान प्राप्त झाले, असे लक्ष्मीकांत पट्टेबहादूर यांनी सांगितले.
सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने नंदनवन कॉलनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस. एल. इंगळे होते. पट्टेबहादूर म्हणाले, सेनानी गावच्या सरपंचाची मुलगी सुजाताने वटवृक्षाखाली जाऊन चांगल्या घरात लग्न होऊन पुत्ररत्न प्राप्त होऊ दे असा नवस मागितला होता. नवस केला, त्याप्रमाणे घडलेही. सिद्धार्थास वनदेवता समजून भोजन आणि खीरदान केले. त्यातून कर्म संयोगाने वैशाख पौर्णिमेला भगवंतांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्याद्वारे संपूर्ण मानवजात सुसंस्कारित झाली. अध्यक्षीय भाषणात इंगळे यांनी सिद्धार्थ गौतमाने मानव जातीवर फार मोठे उपकार केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी नीलकंठ जीवने, माणिकराव ढाकरगे, शकुंतला रहाटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदेश भित्रे यांनी केले. ॲड. दयानंद चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Siddhartha receives divine knowledge from food