शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचताच शुंभाशू शुक्ला यांचा भारतीयांसाठी पहिला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:13 IST

Astronaut Shubhanshu Shukla Axiom-4 Mission:  भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन  शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरले. 

भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन  शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवताच शुंभाशू शुक्ला यांनी भारतीयांशी संवाद साधला. भारतासाठी हा एक मोठा क्षण आणि अंतराळातील देशाच्या भविष्याकडे एक अभिमानास्पद पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. शुंभाशू शुक्ला यांचा भारतीयांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहचल्यानंतर शुभांशू शुक्ला म्हणाले की, "तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी इथे सुखरुप पोहोचलो आहे. इथे उभे राहणे सोपे वाटत असले तरी तसे कठीण आहे. येत्या काही दिवसात इथल्या वातावरणाची आम्हाला सवय होईल. पुढील १४ दिवस आम्ही इथे अनेक संशोधन करणार आहोत. काही वेळापूर्वी ड्रॅगनमध्ये असताना मी तुम्हा सर्वांशी संवाद साधला. यापुढे मी रोज आपल्याशी बोलत राहील. जय हिंद, जय भारत."

शुभांशू शुक्ला पुढे म्हणाले की, "मी अंतराळात येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करताच येथील क्रूने आमचे उस्फुर्त असे स्वागत केले. कुणीतरी आपल्यासाठी घराचे दरवाजे उघडत आहे, असा भास आम्हाला झाला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे येण्यापूर्वी ज्या काही माझ्या अपेक्षा होत्या, त्या आताच पूर्ण झाल्यासारख्या वाटत आहेत."

गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीरित्या जोडले गेले, असे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने आपल्या निवेदनात म्हटले. "शुभांशू शुक्ला यांचे वडील शंभू दयाल शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, शुभांशूची मोहीम यशस्वी होत आहे. याचा मला आनंद आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आमचा गौरव केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे", असेही ते म्हणाले.

टॅग्स :MumbaiमुंबईSpaceअंतरिक्ष