धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:10 IST2026-02-17T11:08:38+5:302026-02-17T11:10:23+5:30

CM Bhagwant Mann Bomb Polonium poison threat : मुख्यमंत्री भगवंत मान दाखल असलेल्या फोर्टिस रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. 'बेअंत सिंह' प्रकरणाचा संदर्भ देत ईमेलमध्ये खळबळजनक दावे. सुरक्षेत मोठी वाढ.

Shocking! Bhagwant Mann claims to have been infected with toxic polonium; Treatment begins at Fortis Hospital | धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु

धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु

मोहाली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या ज्या फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्याच रुग्णालयाला दुपारी १ वाजता बॉम्बने उडवून देण्याची भीषण धमकी देण्यात आली आहे. एका धमकीच्या ई-मेलमुळे संपूर्ण पंजाब हादरले असून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी रुग्णालय परिसराला वेढा घातला आहे. 

मोहालीतील १६ हून अधिक नामांकित शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धमकीच्या ई-मेलमध्ये फोर्टिस रुग्णालयाचाही उल्लेख असून, याच रुग्णालयात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या उपचारासाठी दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि चिंताजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. "भाई दिलावर सिंग यांच्या वारसांनी मान यांना 'पोलोनियम' या विषारी रेडिओएक्टिव्ह पदार्थाने संक्रमित केले आहे," असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, "जर ते वाचले, तर त्यांचा हाल माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्यासारखा केला जाईल. फोर्टिस रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांचा मृतदेहच बाहेर निघेल," अशी टोकाची धमकी देण्यात आली आहे.

पोलोनियम आणि बेअंत सिंग यांचा संदर्भ
धमकीमध्ये उल्लेख केलेला 'पोलोनियम' हा एक दुर्मिळ आणि अत्यंत विषारी रेडिओएक्टिव्ह पदार्थ आहे. तसेच, पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची चंदीगड सचिवालयाबाहेर मानवी बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती, त्या घटनेचा संदर्भ दिल्याने सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.

Web Title : पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान को जहर देने का आरोप; अस्पताल को बम से उड़ाने की धमकी

Web Summary : पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान, जिनका इलाज चल रहा है, को पोलोनियम जहर देने की धमकी मिली। फोर्टिस अस्पताल को बम से उड़ाने की धमकी भरा ईमेल मिला, जिसमें सीएम मान का भी उल्लेख था। सोलह स्कूलों को भी बम की धमकी मिली। हाई अलर्ट घोषित; जांच जारी।

Web Title : Punjab CM Bhagwant Mann Allegedly Poisoned; Hospital Receives Bomb Threat

Web Summary : Punjab CM Bhagwant Mann, undergoing treatment, was threatened with polonium poisoning. Fortis hospital received a bomb threat via email, also mentioning CM Mann. Sixteen schools also received bomb threats. High alert declared; investigation underway.