शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिवपाल यांचा राजीनामा

By admin | Updated: September 16, 2016 02:17 IST

शिवपाल यादव यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या अन्य सर्व पदांसह मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे

लखनौ : शिवपाल यादव यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या अन्य सर्व पदांसह मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. शिवपाल यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा आणि मंत्रिपदाचाही राजीनामा मुलायमसिंग यांच्या सुपूर्द केला. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतरही शिवपाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय पेच आणखीनच चिघळला आहे.शिवपाल यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरताच त्यांचे समर्थक रात्रीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि ‘शिवपाल आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ चे नारे लावले.विशेष म्हणजे शिवपाल यांचे चिरंजीव आदित्य यांनी प्रादेशिक को. आॅप. फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यापाठोपाठ पत्नी सरला यांनीे इटावा जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आतापर्यंत घरातील वाटणारे हे भांडण आता रस्त्यावर आले आहे.

तत्पूर्वी गुरुवारी सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी सायंकाळी तातडीने नवी दिल्लीहून लखनौला धाव घेत पुत्र अखिलेश आणि भाऊ शिवपाल यादव यांच्याशी बंदद्वार चर्चा करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुलायमसिंग यांनी लखनौला येताच सपा परिवारात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच मुलायमसिंग हेही अखिलेश यांना भेटले.

या भेटीत मुलायमसिंग यादव यांनी शिवपाल यांची आधीची सर्व खाती परत करण्याची सूचना अखिलेश यांना केली होती मात्र त्यांनी ती फेटाळून लावली तसेच शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यासह विरोध केला होता. अखिलेश यांनी नमते न घेतल्यामुळे अखेर शिवपाल यांनी दोन्ही पदांवरून पायउतार होत राजीनामे सुपूर्द केले. शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी मुलायमसिंग यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. रात्री वेगाने घडलेल्या या घडामोडींमुळे समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे.