शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखलं, समर्थकांसोबत धक्का-बुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:56 IST

पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर प्रयागराज येथे संगम नगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, येथे एक मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसर "नो-व्हेइकल झोन" म्हणून घोषित करण्यात आला आहे, कोणत्याही मोठ्या ताफ्याला किंवा वाहनाला पुढे जाण्यास मनाई आहे. शंकराचार्य यांना संगम तीरावर जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी ताफ्याला थांबवताच समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की पोलिस आणि शंकराचार्यांचे शिष्य यांच्यात धक्का-बुक्कीही झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी समर्थकांना मागे ढकलले, यामुळे संतांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव मेळा प्रशासनाने माध्यम कर्मचाऱ्यांनाही हटवण्यास सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शंकराचार्यांनी पायी जाण्याची विनंती केली होती. मात्र, ताफ्यातील अनुयायी दर्शनासाठी धावतात. यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते. विभागीय आयुक्त सौम्या अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, पूर्वपरवानगीशिवाय रथातून प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच, ताफा पायी जाताना कोणतेही अनुचित वर्तन किंवा सुरक्षेतील त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत दीड कोटी भाविकांनी केलं संगमात स्नान -
दरम्यान, माघ मेळ्यातील मौनी अमावस्येच्या स्नानोत्सवात सकाळी ९ वाजेपर्यंत १५ दशलक्ष भाविकांनी संगमात स्नान केले. माघ मेळ्यातील सर्वात मोठ्या स्नानोत्सवात मध्यरात्री संगमात स्नान सुरू झाले. दाट धुक्यात संगम परिसरातील सर्व घाटांवर भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे ३ वाजल्यापासून संगम नाक्यावर गर्दी झपाट्याने वाढू लागली. सकाळी ८ वाजेपर्यंत १.३ कोटी लोकांनी संगमात स्नान केले होते. संध्याकाळपर्यंत साडेतीन कोटी भाविक संगमात स्नान करतील असा अंदाज मेळा प्रशासनाने वर्तवला आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Shankaracharya Stopped at Sangam; Clash with Police Over Access

Web Summary : Police stopped Shankaracharya Avimukteshwaranand's convoy at Prayagraj Sangam on Mauni Amavasya due to vehicle restrictions. This led to arguments and scuffles between his supporters and the police. Over 15 million devotees bathed in the Sangam by 9 AM.
टॅग्स :Prayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस