Varanasi Iftar Party: गंगेत गटाराचं पाणी सोडलं जातं, लोक तिथं बसून दारू पितात, मग इफ्तारलाच विरोध का?- वारिस पठाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 21:52 IST2026-03-18T21:51:03+5:302026-03-18T21:52:00+5:30

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पात्रात एका बोटीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यात मांसाहार करणे आणि हाडे नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली.

Sewage water is released into the Ganges, people sit there and drink alcohol, so why oppose Iftar? - Waris Pathan | Varanasi Iftar Party: गंगेत गटाराचं पाणी सोडलं जातं, लोक तिथं बसून दारू पितात, मग इफ्तारलाच विरोध का?- वारिस पठाण 

Varanasi Iftar Party: गंगेत गटाराचं पाणी सोडलं जातं, लोक तिथं बसून दारू पितात, मग इफ्तारलाच विरोध का?- वारिस पठाण 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पात्रात एका बोटीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यात मांसाहार करणे आणि हाडे नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १४ तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी गंगा नदीत एका बोटीवर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीदरम्यान तरुणांनी मांसाहारी पदार्थांचे सेवन केले आणि त्यानंतर हाडे गंगा नदीच्या पात्रात फेकली. याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रजत जयस्वाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हिडीओची दखल घेत वाराणसी पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून अवघ्या २४ तासांच्या आत १४ आरोपींना अटक केली आहे. 

देशात मुस्लिम समाजाविरोधात द्वेष वाढत असल्याचा आरोप करत वारिस पठाण यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. “इतक्या मोठ्या प्रमाणावरचा द्वेष आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नाही. सोशल मीडियावर याआधी नदीपात्रात लोक दारू पित असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, तसेच गटाराचे पाणी त्यात सोडले जाते. कोविड काळात अनेक मृतदेह नदीत फेकल्याच्या घटना समोर आल्या होत्या, मात्र त्यावर कुणीही आवाज उठवला नाही. याउलट, एखाद्याने रोजा सोडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जाते. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात नेमक्या कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title : गंगा प्रदूषण बनाम इफ्तार गिरफ्तारी: वारिस पठान ने भेदभाव पर सवाल उठाए

Web Summary : वारिस पठान ने गंगा में इफ्तार पार्टी के बाद हुई गिरफ्तारियों की आलोचना की, और सवाल किया कि नदी प्रदूषण और अन्य अपराधों के खिलाफ वैसी कार्रवाई क्यों नहीं की जाती। उन्होंने मुस्लिम विरोधी पूर्वाग्रह का आरोप लगाया।

Web Title : Ganga Pollution vs. Iftar Arrests: Waris Pathan Questions Bias

Web Summary : Waris Pathan criticizes arrests after an Iftar party on the Ganges, questioning why similar actions aren't taken against river pollution and other offenses. He alleges anti-Muslim bias.