शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञांची आवश्यकता

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत येणार्‍या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नवीन शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. यासंदभार्तील प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात पहिल्या टप्प्यात १२०० शास्त्रज्ञांची भरती होण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालक डॉ. हीना गोखले यांनी सोमवारी दिली.डीआयएटीमधील कार्यक्रमानंतर ...


संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत येणार्‍या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नवीन शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. यासंदभार्तील प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात पहिल्या टप्प्यात १२०० शास्त्रज्ञांची भरती होण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालक डॉ. हीना गोखले यांनी सोमवारी दिली.
डीआयएटीमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डीआरडीओमध्ये असलेल्या शास्त्रज्ञांच्या कमतरतेबाबत संरक्षणमंत्र्यांनी संसदेत निवेदन दिले होते. नव्या शास्त्रज्ञांच्या भरतीसाठी अर्थमंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर या नियुक्तीसाठीचा नियमित प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही भरती प्रक्रिया डीआरडीओच्या नियमित भरतीप्रक्रियेसारखीच असेल. यात सुरुवातीला ४०० व त्यानंतर दोन टप्प्यात अन्य ८०० शास्त्रज्ञांची भरती होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट
शास्त्रज्ञांसाठी नव्याने अभ्यासक्रमांचे आयोजन

डीआयएटीमध्ये आतापयंर्त डीआरडीओ आणि सैन्यदलातील नवनियुक्त शास्त्रज्ञांसाठीच विविध अभ्यासक्रम चालविण्यात येत होते. आता मात्र, गेट परीक्षेतील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना एम. टेक किंवा पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. यावर्षी ६० विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला आहे. तप पुढील वर्षी ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता यावा, यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे काम सुरू आहे.

डॉ. सुरेंद्र पाल, डीआयएटीचे कुलगुरु