शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या सहकार्याने संत रविदास मंदिर उभारण्यात राज्य सरकार आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:34 IST

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मदतीने संत रविदासांचे मंदिर नव्याने उभारण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मंदिर उभारण्यात अडसर ठरणारी वन विभागाची ‘वादग्रस्त जमीन’ विमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यानिमित्ताने केली. वन परिक्षेत्रात असलेली ही जमीन दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) अखत्यारित आहे. केंद्र सरकारच त्यामुळे यासंबंधी निर्णय घेवू शकते. राज्य सरकारतर्फे दिल्ली विकास प्राधिकरणाला केंद्रीय वन मंत्रालयाकडे जमीन विमुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल, असे मत केजरीवालांनी व्यक्त केले.

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले. पत्रातून त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. १० आॅगस्ट ला डीडीए ने भाविकांच्या भावनांचा विचार न करता हे मंदिर पाडले होते.

संत रविदासांच्या अनुयायांनी त्यानंतर दिल्लीसह इतर राज्यात आंदोलन पुकारले. केवळ दलित समाजासाठी नाही, तर सर्व समाजासाठी संत रविदास श्रद्धेय आहेत. गेल्या पाच शतकांपासून रविदासांचे विचार अनेक पिढ्यांना सशक्त बनवत आहे, असे केजरीवाल म्हणाले.जमीन विमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मंदिराच्या सोसायटीला केंद्र सरकाराकडून जमीन उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांच्या सहकार्याने मंदिर बांधण्यात आनंद होईल, अशी भावना के जरीवालांनी व्यक्त केले.दिल्ली विकास प्राधिकरणाची या जमिनीवर मालकी आहे. त्यामुळे जमीन मोकळी करण्याचा प्रस्ताव डीडीएला सादर करावा लागेल. राज्य सरकारच्या वन विभागाकडे हा प्रस्ताव येताच तो तत्काळ मंजुरीसाठी केंद्रीय वन मंत्रालयाकडे पाठवला जाईल. संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी जवळपास आठवडा लागेल. - राजेंद्र पाल गौतम, सामाजिक न्याय मंत्री, राज्य सरकार

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल