शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:22 PM2021-08-03T15:22:49+5:302021-08-03T15:23:54+5:30

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले.

sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding | शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

Next

नवी दिल्ली: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी समूहाने ताब्यात घेतले. यानंतर अदानी समूहाने विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. शिवसैनिकांनी हा फलक उखडून फेकला. यानंतर शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले. (sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding)

अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांचे संचालन आता अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यात मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समूहाकडे आहे. यानंतर अदानी समूहाकडून सदर फलक लावण्यात आला होता. शिवसैनिकांनी या फलकाची तोडफोड केल्याच्या कृत्यानंतर समर्थन देत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 

जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

 जे झाले तेच पुढेही होत राहणार

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल, शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झाले तेच पुढेही होत राहणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?

दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या जीव्हीके समूहाकडून अलीकडेच अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा स्वत:कडे घेतला आहे. त्याचबरोबर, नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'कडे गेला आहे. त्यानंतर तिथे अनेक बदल केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 'अदानी एअरपोर्ट' असा नामफलक लावण्यात आला होता. वास्तविक हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाते. असे असतानाही तिथे अदानींचा फलक लागल्याने शिवसैनिक संतापले. त्यातून हा फलक हटवण्यात आला.
 

Web Title: sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.