शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज ७

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

भारतीय जैन संघटनेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबीर

भारतीय जैन संघटनेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबीर
वाळूज महानगर : भारतीय जैन संघटना शाखा पंढरपूरतर्फे बजाजनगरातील महावीर भवन येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी पंढरपूर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया होते. प्रमुख मार्गदर्शक सुरेश क टारे यांनी मार्गदर्शन केले. बजाजनगर, पंढरपूर, सिडको, वडगाव कोल्हाटी परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटना पंढरपूर शाखेच्या अध्यक्षा स्मिता बेदमुथा, उपाध्यक्ष मनोज मंडलेचा, अर्चना दुग्गड, सुनीता मंडलेचा, प्रीती कटारिया, भारती गुगळे, ज्योती राका, उज्ज्वला राका, रिता चोपडा आदींनी परिश्रम घेतले.
-------------------------------------
वडगावात विशेष ग्रामसभा
वाळूज महानगर : शासनाच्या ग्राम उदय ते भारत उदय योजनेंतर्गत वडगाव कोल्हाटी - बजाजनगर ग्रामपंचायतीतर्फे शनिवारी सरपंच महेश भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या विशेष ग्रामसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते पारितोषिके वाटप करण्यात आली. काँग्रेसचे शरद जाधव यांनी खाजगी बोअरवेल व विहिरींचे अधिग्रहण करून पाणीप्रश्न सोडवावा, असा ठराव मांडला. यावेळी उपसरपंच हौसाबाई पाटोळे, ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, प्रकाश निकम, शरद जाधव, संदीप आढाव, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत साळे, सचिन गरड, रमाकांत भांगे, अमित चोरडिया, बबन वाहूळ, श्रीकृष्ण भोळे, उषा हांडे, वैशाली जिवरग, उषा साळे, कासार, मंदा भोकरे, अलका शिंदे, जितू दहातोंडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या व नागरिकांची उपस्थिती होती.
फोटो ओळ - ग्राम उदय ते भारत उदय योजनेंतर्गत वडगाव कोल्हाटी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
फोटो क्रमांक - २५ एप्रिल वडगाव
--------------------------------------