बिहारमध्ये 'सम्राट' पर्व; मुख्यमंत्रिपदाची शपथ, जदयूच्या दोन नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:24 IST2026-04-16T06:23:18+5:302026-04-16T06:24:43+5:30

Samrat Choudhary: भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

'Samrat' festival in Bihar; swearing in as Chief Minister | बिहारमध्ये 'सम्राट' पर्व; मुख्यमंत्रिपदाची शपथ, जदयूच्या दोन नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

बिहारमध्ये 'सम्राट' पर्व; मुख्यमंत्रिपदाची शपथ, जदयूच्या दोन नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

- एस. पी. सिन्हा
पाटणा -  भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात जदयू अध्यक्ष नितीशकुमार यांचाही समावेश होता. ज्यांनी एक दिवस आधी मुख्यमंत्रिपद सोडले होते. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान हेही उपस्थित होते.

जदयूचे नेते विजेंद्रप्रसाद यादव आणि विजयकुमार चौधरी यांनीही याच प्रसंगी मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले व सांगितले की, लोकसेवेप्रती असलेली समर्पण भावना, समाजाच्या विविध स्तरांत वावरल्यामुळे मिळालेला अनुभव हे त्यांना कामे करताना उपयोगी पडेल. 

बिहारचा जलद विकास होणार : नितीशकुमार
राज्यसभा सदस्य झालेले नितीश कुमार यांनी सांगितले की, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहार जलदगतीने विकसित होईल व देशातील सर्वाधिक विकसित राज्यांच्या यादीत सामील होईल. एनडीए नेत्यांबरोबरच बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही चौधरी यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या संदेशात उपरोधिक टोला होता.
ते म्हणाले, लोकशाही मार्गाने ‘निवड’ झालेले आधीचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सत्तेवरून हटविण्याची प्रतिज्ञा पूर्ण केल्याबद्दल सम्राट चौधरी यांचे अभिनंदन. ते ‘नियुक्त मुख्यमंत्री’ झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा.

 

Web Title : बिहार में 'सम्राट' पर्व: सम्राट चौधरी मुख्यमंत्री, जदयू के दो नेताओं ने भी ली शपथ

Web Summary : भाजपा के सम्राट चौधरी ने बिहार के मुख्यमंत्री पद की शपथ ली। जदयू के विजेंद्र प्रसाद यादव और विजय कुमार चौधरी ने भी मंत्री पद की शपथ ली। नीतीश कुमार ने चौधरी के नेतृत्व में बिहार के विकास की उम्मीद जताई।

Web Title : Samrat Takes Oath as Bihar CM; Two JDU Leaders Sworn In

Web Summary : BJP's Samrat Choudhary became Bihar's CM, a first for the party. JDU's Vijendra Prasad Yadav and Vijay Kumar Choudhary also took oaths as ministers. Nitish Kumar expects rapid development under Choudhary's leadership.