माढा येथे रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30

माढा : माढा येथील शिवाजी नगरातील भूमिगत गटारी व रस्ता काँक्रीट कामाचा शुभारंभ माजी सभापती चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़

Road work at Madha | माढा येथे रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

माढा येथे रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

ढा : माढा येथील शिवाजी नगरातील भूमिगत गटारी व रस्ता काँक्रीट कामाचा शुभारंभ माजी सभापती चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़
माढा शहरातील विविध समस्या सोडण्यासाठी आमदार फंड, जि़ प़ व पं़स़ फंड एकत्र आणून विकासकामे करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले़ शिवाजी नगरातील रस्त्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून ४ लाख ५० हजार व रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लाख ८० हजारांचा निधी खर्च करण्यात आल्याचे जि़प़सदस्य झुंझार भांगे यांनी सांगितले़
यावेळी माजी सरपंच राजेंद्र राऊत, आनंद भांगे, नाना गरड, रूपेश मुळे, अविनाश भोसले, गणेश साळुंखे, सागर करळे, गजेंद्र घोलप, महादेव जगदाळे, औदुंबर पवार, सूर्यकांत धोत्रे, संतोष कसबे, प्रदीप भांगे, महेश भांगे, भैय्या मस्के, नागेश मस्के, बालाजी पालकर आदी उपस्थित होते़

Web Title: Road work at Madha