शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Riwaba Jadeja: आमदार पत्नीसोबतचा पहिला फोटो, बायकोला रविंद्र जडेजाची 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:48 PM

Riwaba Jadeja: आता, पती रविंद्र याने आपल्या आमदार पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

जामनगर : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विक्रमी जागा मिळवत आपला बालेकिल्ला वाचवला. या निवडणुकीत अनेक नामांकित उमेदवार आपले नशीब आजमावत असताना सर्वांच्या नजरा जामनगर उत्तरच्या निकालाकडे लागल्या होत्या. कारण, इथे क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा या भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, रविबा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून त्या पहिल्यांदाच आमदार बनल्या आहेत. आता, पती रविंद्र याने आपल्या आमदार पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या विजयानंतर रिवाबा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने रोड शो देखील केला. जनतेने दिलेले प्रेम आणि आपुलकीबद्दल जामनगरवासीयांचे त्यांनी आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना रिवाबा म्हणाल्या, "गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहील." त्यानंतर, आता जडेजाने पत्नीसोबतचा फोटो ट्विट केला आहे.

जडेजाने ट्विट केलेल्या फोटोत पत्नी रिवाबा यांच्या हातात MLA Gujarat असं लिहलेला टेबल स्टॉल आहे. त्यासोबत जडेजाने कॅप्शनही लिहिले असून जनतेचे आभार मानले आहेत. ''हॅलो आमदारसाहिबा तुम्ही हे पदासाठी सन्मानार्थ आहात. जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो.  मी आशापूर्वक विनंती करतो की, जामनेरच्या जनतेची कामे खूप चांगल्या रितीने होतील. जय माताजी...'', असे गुजराती भाषेतील शब्द रविंद्र जडेजाने लिहिले आहेत. दरम्यान, या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट करुन दोघांचेही अभिनंदन केले आहे. 

जडेजाचेही राजकारणात येण्याचे संकेत

पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता. अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला. 

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाGujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022jamnagar-pcजामनगर