इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यावर निर्बंध

By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश

Restrictions on Indraani River Drinking Water | इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यावर निर्बंध

इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यावर निर्बंध

लखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश
पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी अथवा स्वयंपाका करीत वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी सुरेश जाधव यांनी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३३ नुसार हे निर्बंध घातले आहे.
पालखी सोहळ्या निमित्त येणारे वारकरी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीत स्नान करतात, कपडे धुतात यामुळे नदीचे पाणी दूषीत होते. यामुळे श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीचे पाणी कुबेर गंगा ते थेट थोरले पूलापर्यंत कोणत्याही ठिकाणी दोन्ही तीरावर पिण्यासाठी किंवा स्वयंपाकाकरीत उपयोगात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. येणा-या भाविकांनी गावात असलेल्या ज्या विहीरीचे शुध्द केलेल पाणी भांडी घासणे व इतर कामासाठी वापरावे. गावामध्ये असलेल्या नळाचे च पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकाकरीता वापरावे. तसेच नदीच्या पात्रात कोणतेही घाणेरडे कपडे धुवू नयेत व नदीचे पाणी दूषीत होईल असे कृत्य करु नये. प्रशासनाच्या वतीने कपडे धुण्यासाठी नदीच्या काठावर काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत, याच ठिकाणी कपडे धूवावेत. याशिवाय स्नानाच्या जागा पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळ्या राखून ठेवलेल्या आहेत, त्याच जागेत संबंधितांनी स्थान करावे, असे आदेश जाधव यांनी दिले आहेत. हे आदेश ११ जुलै पर्यंत सर्वांसाठी बंधनकारक आहेत.

Web Title: Restrictions on Indraani River Drinking Water