शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Ranya Rao : "मला खूप शिवीगाळ केली, धमकावलं"; न्यायालयात रडली रान्या राव, केला मानसिक छळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:42 IST

Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं.

सोन्याची तस्करी करताना बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयीन सुनावणीदरम्यान, रान्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर मानसिक छळ आणि गैरवर्तनाचा आरोप केला. याच दरम्यान ती न्यायालयात ढसाढसा रडली. मात्र अधिकाऱ्यांनी तिचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि अभिनेत्री तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे.

अटक झाल्यानंतर अभिनेत्रीला शुक्रवारी आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे तिला २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने रान्याला अनेक प्रश्न विचारले. न्यायालयाने अभिनेत्रीला विचारलं की तिला काही त्रास झाला का? यावर अभिनेत्री न्यायालयातच रडू लागली आणि डीआरआय अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला.

"मी उत्तर दिलं नाही तर ते मला धमकावतात"

न्यायालयाने यानंतर रान्याला विचारलं की, तिला वैद्यकीय उपचार मिळाले का? या प्रश्नाचे उत्तर देताना, अभिनेत्रीने दावा केला की, तिला मानसिक छळाचा सामना करावा लागला आहे. "जर मी उत्तर दिलं नाही तर ते मला धमकी देतात आणि म्हणतात, तू बोलली नाहीस तर काय होईल हे तुला माहिती आहे" असंही अभिनेत्रीने सांगितलं. तसेच "त्यांनी मला मारलं नाही, पण  मला खूप शिवीगाळ केली. यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला आहे" असं सांगितलं. 

तपासात सहकार्य न करण्याचा आरोप 

अभिनेत्री न्यायालयात हजर असताना सहाहून अधिक डीआरआय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रान्याचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत आणि तिच्यावर प्रश्नांची उत्तरं न देण्याचा आणि तपासात सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे. "चौकशीदरम्यान तिने कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला आहे. आम्ही जेव्हा जेव्हा विचारतो तेव्हा ती गप्प राहते. आम्ही संपूर्ण चौकशी रेकॉर्ड केली आहे" असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय