शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

रामदेव बाबांच्या आटा नूडल्सला परवानगीच्या वादाची फोडणी

By admin | Updated: November 18, 2015 09:43 IST

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीतर्फे सुरु करण्यात आलेली आटा नूडल्स बाजारपेठेत दाखल होताच वादाच्या भोव-यात सापडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ -  योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीतर्फे सुरु करण्यात आलेली आटा नूडल्स बाजारपेठेत दाखल होताच वादाच्या भोव-यात सापडली आहे. आटा नूडल्सला भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाची (FSSAI) अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे समोर आले आहे. 

बाबा रामदेव यांनी सोमवारी गाजावाजा करत आटा नूडल्स लाँच केली. या क्षेत्रातील विदेशी कंपन्यांची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. मात्र लाँच होण्याच्या दोन दिवसांनंतरच आटा नूडल्सलाही वादाची फोडणी मिळाली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आटा नूडल्सला अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने अद्याप परवानगीच दिलेली नाही. मात्र परवानगी नसतानाही आटा नूडल्सला परवाना क्रमांक कसा दिला गेला हे अद्याप समजू शकलेले नाही. याविषयी एफएसएसएआयचे प्रमुख आशिष बहुगूणा म्हणाले, आटा नूडल्सचे प्रकरण आमच्याकडेही आले आहे. आम्ही अद्याप नूडल्सला परवानगी दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करत आहोत. परवाना देण्याचे काम राज्य सरकारचे असते. पण आम्ही परवानगी दिली नसताना राज्य सरकारने परवाना कसा दिला  असा सवाल एफएसएसएआयच्या अधिका-यांनी उपस्थित केला आहे. पतंजलीच्या प्रसिद्धीप्रमुखांनी या तांत्रिकबाबींविषयी आम्हाला काही माहिती नाही. संबंधीत व्यक्तींची चर्चा करुन प्रतिक्रिया देऊ असेे इंडियन एक्सप्रेसला सांगितले.