शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांच्या हाती कृषी क्षेत्र देण्याची मोदींची इच्छा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; राहुल गांधींचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:09 IST

राहुल गांधी यांनी देशाला इशारा दिला की, मोदी सरकारने ज्या प्रकारे अन्य क्षेत्रे चार पाच भांडवलदार मित्रांच्या हाती दिली आता फक्त कृषी क्षेत्र राहिले आहे. त्यातील एकाधिकारही मोदी समाप्त करू इच्छितात. त्याचा थेट परिणाम देशाच्या भविष्यावर पडणार आहे.

शीलेश शर्मा
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार कृषी क्षेत्र त्यांच्या चार पाच मित्रांच्या हाती सोपवू इच्छितात. देशातील विमानतळे, ऊर्जा, दूरसंचार, रिटेल आदी क्षेत्रे आपल्या मित्रांच्या हाती तर त्यांनी आधीच सोपवली आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, असे गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी देशाला इशारा दिला की, मोदी सरकारने ज्या प्रकारे अन्य क्षेत्रे चार पाच भांडवलदार मित्रांच्या हाती दिली आता फक्त कृषी क्षेत्र राहिले आहे. त्यातील एकाधिकारही मोदी समाप्त करू इच्छितात. त्याचा थेट परिणाम देशाच्या भविष्यावर पडणार आहे.

अर्णव गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप्प चॅट प्रकरणावर बोलताना गांधी यांनी मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, त्या चॅटमधून जो खुलासा झाला, बालाकोट हल्ल्याशी संबंधित घटना, जवान मारले जाण्याबद्दल ज्या गोष्टी समोर आल्या त्या अत्यंत गंभीर आहेत. ही गोपनीय माहिती गोस्वामी यांना कोणी दिली असा प्रश्नही त्यांनी विचारला. कदाचित पंतप्रधान मोदी किंवा हवाईदल प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांनी. कारण गोपनीय माहिती याच पाच जणांकडे होती. हे स्पष्ट आहे की यांच्यापैकीच कोणीतरी ती दिली. याची चौकशी व्हायला हवी. जर मोदी यांनी माहिती दिली असेल तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असे ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्या हस्ते "खेती का खून' या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. उल्लेखनीय आहे की, राहुल गांधी यांच्या या टीकेच्या आधी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करताना म्हटले होते की, चीनच्या मुद्यावर राहुल गांधी किती दिवस खोटे बोलणार आहेत? 

देशातील सर्वोच्च संस्थांवर पंतप्रधानांचे नियंत्रण -
-    राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला की, देशातील सर्वोच्च न्यायालय, प्रसारमाध्यमे किंवा संसद अशा सगळ्या संस्थांवर मोदी यांचे नियंत्रण आहे. “मी मोदींना भीत नाही, त्यांच्यापेक्षा जास्त कट्टरपंथी आहे, मला ते स्पर्शही करू शकत नाहीत. मात्र गोळी मारू शकतात” असे राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या
वेदनांबद्दल बोलताना म्हणाले.
-   चीनच्या विस्तारवादी प्रवृत्तीबद्दल सरकारला इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही चीनचे ते धोरण समजून घेतले पाहिजे न की इव्हेंट मॅनेजमेंट. कारण चीन एक ठरवून रणनीतीने पुढे सरकत आहे. आमच्या सरकारला त्यातील गांभीर्य समजत नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप