शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 20:09 IST

राहुल गांधी यांनी रेल्वे ट्रॅकमनची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अनेकदा देशातील तळागळातल्या लोकांच्या भेटी घेतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, आज त्यांनी रेल्वे ट्रॅकमनशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये राहुल गांधींच्या हातात हातोडा दिसत आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. यावेळी त्यांनी ट्रॅकमनचे जॅकेटही घातले होते.

राहुल गांधींनी हा व्हिडिओ X वर पोस्ट करताना लिहिले की, रेल्वेला गतिमान आणि सुरक्षित ठेवणाऱ्या ट्रॅकमन बंधूंसाठी प्रणालीमध्ये ना पदोन्नती आहे ना भावना. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅकमन हे सर्वात दुर्लक्षित आहेत. मला त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या समस्या आणि आव्हाने समजून घेण्याची संधी मिळाली.

ट्रॅकमन 8-10 किमी चालतो राहुल गांधी पुढे लिहितात, ट्रॅकमन 35 किलो टूल्स घेऊन दररोज 8-10 किमी चालतो. त्याची नोकरी ट्रॅकवरच सुरू होते आणि तो ट्रॅकवरुनच निवृत्त होतो. इतर कर्मचारी ज्या विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यातही ट्रॅकमनला बसू दिले जात नाही. ट्रॅकमन बंधूंनी सांगितले की, कामादरम्यान अपघातात दरवर्षी सुमारे 550 ट्रॅकमन आपला जीव गमावतात, कारण त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नसते.

ट्रॅकमनला सुरक्षा साधने मिळावीतप्रतिकूल परिस्थितीत मूलभूत सुविधांशिवाय रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या ट्रॅकमन बंधूंच्या या प्रमुख मागण्या कोणत्याही परिस्थितीत ऐकल्या पाहिजेत. 1. कामाच्या दरम्यान प्रत्येक ट्रॅकमनला सुरक्षा उपकरणे मिळावीत, जेणेकरून त्याला ट्रॅकवर ट्रेन येण्याची वेळेवर माहिती मिळू शकेल. 2. ट्रॅकमनला विभागीय परीक्षेद्वारे (LDCE) पदोन्नतीची संधी मिळावी. ट्रॅकमनच्या कठोर परिश्रमानेच करोडो देशवासीयांचा सुरक्षित रेल्वे प्रवास पूर्ण होतो, त्यांची सुरक्षा आणि प्रगती दोन्हीही आपल्याला सुनिश्चित करावी लागेल, असे राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे