'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:18 IST2026-03-18T15:07:55+5:302026-03-18T15:18:36+5:30

Kangana Ranaut News: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगना राणौत यांनी राहुल गांधींबाबत एक टिप्पणी करताना त्यांचा टपोरी असा उल्लेख केला आहे.

'Rahul Gandhi comes like a tapori, with anyone...' Kangana Ranaut's controversial statement | 'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान

'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगना राणौत यांनी राहुल गांधींबाबत एक टिप्पणी करताना त्यांचा टपोरी असा उल्लेख केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांचं वर्तन योग्य नसल्याचा आणि त्यांची संसदेतीत भूमिका चांगली नसल्याचे सांगत काही नोकरशहांनी पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचा आधार घेत आता कंगना राणौत यांनी राहुल गांधींवर ही टीका केली आहे.

याबाबत कंगना राणौत म्हणाल्या की, ‘’राहुल गांधींना पाहिल्यावर आम्हा महिलांना थोडं अस्वस्थ वाटतं. ते अगदी एखाद्या टपोरीसारखे येतात. कुणासोबतही बेधडकपणे बोलतात. कुणालाही अरे तुरे करून संबोधतात, जर कुणी मुलाखत देत असले तर हुटिंग करून लोकांना बोलावतात. त्यांचं वर्तन नेहमी असहज करणारं असतं’’.

कंगना राणौत पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी त्यांच्या बहिणीकडून काही शिकलं पाहिजे. प्रियंका गांधी यांचं वर्तन खूप चांगलं आहे. त्यांच्यामध्ये शिष्टाचार आहे. मात्र राहुल गांधींना पाहिल्यावर लाज वाटते, असा टोला कंगना राणौत यांनी लगावला आहे.

दरम्यान, संसद परिसरात हल्लीच घडलेल्या घटनांवरून २०० पेक्षा अधिक निवृत्त नोकरशाहा, माजी सैनिक, अधिकारी यांनी एक संयुक्त पत्र लिहिलं होतं. तसेच राहुल गांधी यांची संसदेमधील वागणूक चांगली नाही. तसेच आपल्या वर्तनाबाबत राहुल गांधी यांनी त्यांच्या वर्तनाबाबत माफी मागावी, अशी मागणीही या नोकरशहांनी केली. लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांसह संसदेच्या पायऱ्या ह्यासुद्धा संसद परिसराचा भाग आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी मर्यादांचं पालन केलं पाहिजे, असे या निवृत्त अधिकाऱ्यांना आपल्या पत्रात लिहिले आहे.  

Web Title : कंगना रनौत ने राहुल गांधी को 'टपोरी' कहा, विवाद

Web Summary : कंगना रनौत ने राहुल गांधी को 'टपोरी' कहकर आलोचना की और उनके संसदीय व्यवहार पर सवाल उठाया। उन्होंने प्रियंका गांधी के साथ प्रतिकूल तुलना की। सेवानिवृत्त नौकरशाहों ने भी संसद में गांधी के आचरण की आलोचना की, माफी की मांग की।

Web Title : Kangana Ranaut calls Rahul Gandhi a 'tapori,' sparks controversy.

Web Summary : Kangana Ranaut criticized Rahul Gandhi, calling him a "tapori" and questioning his parliamentary behavior. She contrasted him unfavorably with Priyanka Gandhi, citing decorum. Retired bureaucrats also criticized Gandhi's conduct in Parliament, requesting an apology.