शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:36 IST

किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत.

नवी दिल्ली -  किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत. आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना केलेल्या कृतीमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.आज राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  हे भाषणाकडे लक्ष देण्याऐवजी मोबाइलवर व्यस्त असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 17 व्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र आपल्याच विश्वात मग्न असल्याचे कॅमेऱ्याने टिपले. एकीकडे राष्ट्रपती आपल्या भाषणामधून विविध मुद्दे मांडत होते. तर राहुल गांधी मात्र मोबाइलवर काहीतरी टाइप करत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसत आहे. सुमारे एक तास चाललेल्या राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान सुमारे 24 मिनिटे राहुल गांधी मोबाइलवर गुंतलेले दिसत होते. 

यावेळी त्यांच्याशेजारी बसलेल्या यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी मात्र राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे लक्षपूर्वक ऐकत होत्या. तसेच त्यातील काही मुद्द्यांना दादही देत होत्या. मात्र राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींनी अभिभाषणादरम्यान मांडलेल्या कुठल्याही मुद्द्याला दाद दिली नाही. दरम्यान, राष्ट्रपती सरकारने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत असताना राहुल गांधी हे संसदेमध्ये फोटो काढताना आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. उरी येथील सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट येथील एअर स्ट्राइकचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये केल्यानंतर संपूर्ण सभागृहाने त्याला जोरदार दाद दिली. सोनिया गांधी यांनीही बाक वाजवून दाद दिली. मात्र राहुल गांधी यांनी त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसParliamentसंसद