शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस रवाना

By admin | Updated: April 3, 2017 17:14 IST

आयटम गर्ल राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - आयटम गर्ल राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सतत वादात असणा-या राखी सावंतविरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी रवाना झाले आहेत.  भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही हजर न राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आला. 
 
राखी सावंतने भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक होणार आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाला अनुसरुन भगवान वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. तेव्हापासून राखीवर वाल्मिकी समाजाचा रोष ओढावला आहे. या घटनेनंतर राखीला न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही तिने न्यायालयात हजर न राहता न्यायव्यवस्थेचा एक प्रकारे अपमानच केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण आता तिच्या अंगलगट येताना दिसत आहे. 
 
राखी विरोधात तक्रार दाखल करणा-या अ‍ॅडव्होकेटनारिंदर आदिया यांनी म्हटले की, "आरोपी कितीही शक्तिशाली असला तरी, न्यायालयापासून स्वत:च बचाव करू शकणार नाही". आदिया यांना विश्वास आहे की, पोलीस राखीला न्यायालयात हजर करतील, तर वरिष्ठ वकील मलविंदर सिंह घुम्मन यांनी म्हटले की, "कायदा सगळ्यांसाठी समान असून, पोलीस त्यांचे काम करीत आहेत".