Protest against rape, fire girl; The accused arrested in the neighborhood | बलात्काराला विरोध, तरुणीला पेटवून दिले; शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक
बलात्काराला विरोध, तरुणीला पेटवून दिले; शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक

बिहार: बलात्काराला विरोध केला म्हणून तरुणीला (२३) पेटवून दिले. त्यात ती ५० टक्के जळाली. येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. पीडितेच्या आईने अहियापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक झाली आहे, असे ठाणे अधिकारी विकास राय यांनी सांगितले.

तक्रारीनुसार शनिवारी तरुणी घरी एकटीच होती. आरोपी तिच्या घराशेजारीच राहतो. त्याने तिच्या घरात शिरून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पीडितेची आई प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे. तिला घडलेल्या प्रकाराबद्दल स्थानिकाने माहिती दिल्यावर ती घरी आली व तिने तिला रुग्णालयात नेले.

आठवड्यापूर्वी समस्तीपूर आणि बक्सर जिल्ह्यात दोन महिलांचे जळालेले मृतदेह आढळल्यानंतर ही घटना घडली. या महिलांची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त झाला आहे.च्अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यात आठ वर्षांच्या मुलीचा पोत्यात भरलेला मृतदेह सहा डिसेंबर रोजी फळांच्या बागेत आढळला होता. या मुलीवरही बलात्कार झाल्याचा संशय आहे.

Web Title: Protest against rape, fire girl; The accused arrested in the neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.