शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो फ्लाय झोन’ ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: January 19, 2015 03:01 IST

बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे साज-या होणा-या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजपथावर बराक ओबामा उपस्थित असतील

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे साज-या होणा-या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजपथावर बराक ओबामा उपस्थित असतील. या कालावधीत राजपथावरील ५ कि.मी. भाग नो फ्लाय झोन जाहीर करावा असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला होता; पण राजपथावर नो फ्लाय झोन जाहीर केल्यास प्रजासत्ताक दिनाचा पारंपरिक फ्लायपास्ट रद्द करावा लागेल असे कारण देऊन भारताने हा प्रस्ताव नाकारला आहे. भारताची भूमिका अमेरिकेच्या सुरक्षा पथकाने यासाठी नागरी उड्डयन खात्याच्या सरसंचालकांशीही संपर्क साधला; पण लष्करी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला नकार देण्याचे आपले धोरण कायम ठेवले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दुहेरी इंजिनची लष्करी विमाने व हेलिकॉप्टर उडणारच असा लष्कराचा दावा आहे. राजपथावर लष्करी विमाने व हेलिकॉप्टर उडण्याचा कालावधी फक्त दहा मिनिटांचा असेल. एरवी वर्षभर राष्ट्रपती भवन, साऊथ व नॉर्थ ब्लॉक, पंतप्रधानांचे निवासस्थान व आजूबाजूच्या परिसरात नो फ्लाय झोनच असतो, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. ओबामा पाहतील आपल्या देशाची विमाने राजपथावर उपस्थित असणाऱ्या ओबामा यांना त्यांच्या देशाकडून भारताने खरेदी केलेली सी -१३० जे सुपर हर्क्युलस, सी-१७ ग्लोबमास्टर- ३, पोसिडॉन -८१ ही लांब पल्ल्याची गस्त विमाने पाहता येतील यासाठी भारताने ७ अब्ज डॉलरचा करार अमेरिकेशी केला होता. त्याबरोबरच आधीच्या विमानांची पुन्हा आॅर्डर, तसेच अपाचे अटॅक व चिनूक या जडवाहू हेलिकॉप्टरची २.५ अब्ज डॉलरची आॅर्डर मिळण्याच्या बेतात असून, त्याचाही अंदाज घेण्याची संधी बराक ओबामा यांना मिळणार आहे.