शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणांची गती कायम ठेवणार - पंतप्रधानांची ग्वाही

By admin | Updated: January 17, 2015 03:37 IST

देशात सकारात्मक नियमन संरचना, कर व्यवस्थेत स्थैर्य आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन देत सुधारणांच्या अत्युच्य वेगवान गतीसह वाटचाल

नवी दिल्ली : देशात सकारात्मक नियमन संरचना, कर व्यवस्थेत स्थैर्य आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन देत सुधारणांच्या अत्युच्य वेगवान गतीसह वाटचाल करताना देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या २ हजार अब्ज डॉलरवरून २० हजार अब्ज डॉलरवर नेण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सध्या गॅस सिलिंडरसाठी असलेली रोख हस्तांतरण योजना (डीसीटी) अन्य योजनांसाठी लागू करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. विकासाचा परिणाम रोजगारांच्या संधींच्या रूपाने दिसायला हवा. नियमांत बदल करीत करव्यवस्थेत सुधारणा घडवून आणल्या जातील. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून सबसिडी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.आम्ही गुंतवणुकीच्या मार्गांत येणाऱ्या विविध अडचणी दूर करीत आहोत. कर व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणांची गरज आहे. त्या दिशेने पुढाकार घेण्यात आला आहे. मी वेगावर विश्वास ठेवतो. झपाट्याने व्यापक बदल आणायचे असून येत्या काळांत तुम्ही त्याची प्रशंसा कराल, असे ते अर्थव्यवस्थेवरील परिषदेत म्हणाले. प्रशासकीय कामात सुधारणा ही निरंतर प्रक्रिया आहे. काळाला अनुसरून नियम आणि प्रक्रिया नसतील तेथे बदल करण्यावर सरकार भर देत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये विकासदर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. घोटाळ्यावर घोटाळे समोर आले. आता नव्या युगाच्या भारताचा उदय होत आहे.