शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishore Arrested : प्रशांत किशोर यांना पोलिसांनी केली अटक; भल्या पहाटे BPSC आंदोलनात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:28 IST

Prashant Kishore Arrested : प्रशांत किशोर हे पाटण्यातील गांधी मैदानात आंदोलन करत होते.

Prashant Kishore Arrested : पाटणा : जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे.  दरम्यान, बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात प्रशांत किशोर आंदोलन करत होते. प्रशांत किशोर हे पाटण्यातील गांधी मैदानात आंदोलन करत होते. यादरम्यान पोलिसांनी सोमवारी पहाटे पाच वाजता गांधी मैदान गाठून प्रशांत किशोर यांना आधी ताब्यात घेतले आणि पाटणा एम्समध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना अटक केली आहे.

('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशांत किशोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले,  तेव्हा ते ब्लँकेट पांघरून झोपले होते. सध्या प्रशांत किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गांधी मैदानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलीस प्रशांत किशोर यांना घटनास्थळावरून हटवताना दिसत आहेत. यावेळी आंदोलक पोलिसांना रोखण्याचा प्रयत्नही करत होते. पोलिसांनी इतर आंदोलकांनाही ताब्यात घेतले आहे. 

बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित अनियमिततेच्या आरोपांमुळे प्रशांत किशोर यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर, बिहार लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या ७० व्या संयुक्त (प्राथमिक) स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी 'पीटीआय'शी बोलताना म्हटले होते की, "हे नेते आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. गांधी मैदानात आपण पाच लाख लोक एकत्र करू शकतो. असे करण्याची हीच वेळ आहे. तरुणांचे भवितव्य पणाला लागले आहे. आम्ही एका क्रूर शासनाचा सामना करत आहोत, ज्याने केवळ तीन वर्षांत ८७ वेळा लाठीचार्जचा आदेश दिल आहे."

दरम्यान, बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात प्रशांत किशोर हे २ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करत होते. त्यांच्यावर उपचार न केल्यास त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. तरीही, प्रशांत किशोर यांच्यावर उपचार सुरू नव्हते. अखेर पोलिसांनी पहाटे पाच वाजता गांधी मैदान गाठून प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतले आणि पाटणा एम्समध्ये दाखल केले. त्यानंतर अटक केली आहे.
 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार