शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

pollution : गुडगाव ठरले भारतातील सर्वात प्रदूषित शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:55 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे.

गुडगाव - वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, गुरगाव हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या 62 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासली त्यामध्ये गुरगावमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्यासे समोर आले. रविवारी येथे एअर क्वालिटी इंडेक्स 321 एवढा मापण्यात आला. हवा प्रदूषणाची ही सर्वात धोकादायक पातळी मानली जाते. दिल्ली-एनसीआरमधील अन्य प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथेही हवेची पातळी खराब असल्याचे समोर आले आहे.  एकीकडे अधिकाऱ्यांनी गुडगांवमधील हवा प्रदूषित होण्यामागे अरब द्विपकल्पात आलेले धुळीचे वादळ कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. मात्र जबाबदार प्राधिकरणांकडून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान (जीआरएपी) ची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा पर्यावरणवादी करत आहेत.   सीपीसीबीच्या एअर लॅब डिव्हिजनचे माजी प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गुडगावला बसला आहे. गुडगाव दिल्लीच्या पश्चिमेस असल्याने आणि धुळीचे कण वायव्येकडून येत असल्याने गुडगावमधील हवा प्रदूषित झाली आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्येही आर्द्रतेचा स्तर जास्त आहे. त्यामुळे धुलीकण हवेतील ओलाव्याला चिकटत आहेत. आता जोपर्यंत मुसळधार पाऊस पडत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. मात्र हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही."  

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतnewsबातम्या