शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत चक्क बैलगाडी चालकाला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 15:37 IST

अजब कारवाईची जिल्ह्यात चर्चा

बिजनोर: नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक पोलिसांकडून देशभरात कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एका ट्रक चालकाला दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. यानंतर आता उत्तर प्रदेशमधल्या बिजनोरमधील पोलिसांच्या अजब कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. साहसपूर जिल्ह्यात पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत चक्क एका बैलगाडी चालकाला दंड ठोठावला आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. साहसपूरचे रहिवासी असलेल्या रियाज हसन यांची बैलगाडी शनिवारी त्यांच्या शेताच्या शेजारी उभी होती. तितक्यात सहपोलीस निरीक्षक पंकज कुमार यांच्यासह एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं. गस्त घालणाऱ्या पोलीस पथकानं आसपास पाहणी केली. त्यावेळी त्यांना बैलगाडीजवळ कोणीही आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी काही ग्रामस्थांकडे बैलगाडीबद्दल विचारणा केली. यानंतर पोलीस थेट हसन यांच्या घरी पोहोचले. त्यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ८१ नुसार हसन यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. हसन यांनी दंड भरण्यास स्पष्ट नकार दिला. मी माझ्या शेताच्या बाहेर बैलगाडी उभी केली होती. त्यामुळे दंड कशाला भरायचा? मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत बैलगाडीवर कारवाई कशी होऊ शकते?, असे प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारले. यानंतर पोलिसांनी त्यांना ठोठावलेला दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हसन यांना दिलासा मिळाला.अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीनंतर पोलिसांचं पथक गस्त घालत असताना त्यांना हसन यांची बैलगाडी दिसली, अशी माहिती साहसपूर पोलिसांचे प्रभारी पी. डी. भट्ट यांनी दिली. 'बहुतांश ग्रामस्थ बैलगाडीतून वाळू घेऊन जातात. शेताच्या जवळ उभ्या असलेल्या बैलगाडीचा वापरदेखील वाळूच्या वाहतुकीसाठी केला जात असावा असा संशय पोलिसांना आला. त्यामुळेच त्यांनी मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत दंडाची कारवाई केली,' असं भट्ट यांनी सांगितलं.