शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारा काश्मीरमधील पोलीस अधिकारी निलंबित

By admin | Updated: October 14, 2016 10:06 IST

पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिका-यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी गुप्त व संवेदनशील माहिती पुरवणा-या पोलिस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १४ - पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिका-यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी गुप्त व संवेदनशील माहिती पुरवणा-या पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खो-यात तणावाचे वातावरण असतानाच डीएसपी(पोलीस उपअधीक्षक) तन्वीर अहमद यांच्यावर पाकिस्तानी एजंट्सना गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी (पोलीस महासंचालक) के. राजेंद्र कुमार यांना या गोष्टीचा संशय येताच त्यांनी तन्वीर अहमद यांच्यावर पाळत ठेवली व अखेर पुरेसे पुरावे हाती आल्यानंतर गुरूवारी अहमद यांना निलंबित करण्यात आले. 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वीर अहमद गेल्या काही काळापासून टेलिफोनच्या माध्यमातून सतत सीमावर्ती भागातील पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून डीजीपींना मिळाली होती. 
आरोपी तन्वीर अहमद यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ' सुमारे महिन्याभरापूर्वी मला कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. समोरील व्यक्तीने आपण सैन्यातील कमांडर असल्याचे सांगिंतले व काश्मीर खो-यात  तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलातील जवानांची माहिती मागितली. मात्र त्याला ती माहिती देण्यापूर्वी आपण वरिष्ठ अधिका-यांकडून (एसपी) परवानगी घेतली होती' असे स्पष्टीकरण तन्वीर यांनी दिले.
 
पण तन्वीर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे सुरक्षा रक्षकांची माहिती दिली, गृहमंत्रालयातील अधिका-यांना याचा सुगावा लागताच त्यांनी ताबडतोब तन्वीर यांचे सर्व फोन कॉल रेकॉर्ड करून तपास सुरू केला. तसेच पोलीस महासंचालक  के. राजेंद्र कुमार यांनाही सावध केले. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी किमान १५ दिवस अाधी तन्वीर यांच्यावर बारकाईने नजर ठेवली. 
काश्मीर खो-यात तैनात असलेल्या पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून असे फोन येत असतात. आपण सुरक्षा एजन्सीचे अधिकारी असल्याची बतावणी करून ते संबंधित अधिका-यांकडून सुरक्षा दलांच्या तैनातीची माहिती मागतात, असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्करातील अधिकारी त्यांना माहिती देणं टाळतात.