शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

PM Modi US Visit : देशाची करोडोंची संपत्ती! 'स्पेशल 157' गिफ्ट घेऊन मोदी मायदेशी निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 8:39 AM

PM Modi US Visit: अनेक उद्योगपतींनी भारतात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. मोदींनी त्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभे करण्यास सांगितले. तसेच जर अमेरिकी कंपन्या भारतात आल्या तर केवल अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशातही रोजगार उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले. 

न्यूयॉर्क : अमेरिकेतील तीन दिवसांचा दौरा संपवून नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मायदेशी रवाना झाला आहेत. या दौऱ्यात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. या दौऱ्यात मोदींनी मोठमोठे उद्योजक, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्या आधी मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेतही सहभाग घेतला होता. (PM Modi concludes 3-day visit, to bring back 157 artefacts US handed over)

मोदींचा हा अमेरिका दौऱा भारतीय सैन्य दलाला मोठे बळ देणार आहे. अमेरिकेचे खतरनाक हवाई ड्रोन भारत विकत घेणार आहे. याचरोबर हा दौरा आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा ठरला आहे. अमेरिकेने भारताला 157 वस्तू गिफ्ट केल्या आहेत. या वस्तू म्हणजे भारताच्याच आहेत, परंतू तस्करी करण्यात आल्या होत्या. प्राचीन ठेवा असलेल्या 157 कलाकृती आणि अँटीक वस्तू अमेरिकेने भारताकडे सुपूर्द केल्या आहेत. 

अनेक उद्योगपतींनी भारतात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. मोदींनी त्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभे करण्यास सांगितले. तसेच जर अमेरिकी कंपन्या भारतात आल्या तर केवल अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशातही रोजगार उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले. 

काय काय आहे त्या स्पेशल गिफ्टमध्ये..या पुरातन कलाकृती आहेत. या चोरीच्या मार्गाने अमेरिकेत आणण्यात आल्या होत्या. यापैकी 71 सांस्कृतक, हिंदू धर्माच्या 60, बौद्ध धर्माच्या 16 आणि जैन धर्माच्या 9 मूर्ती आहेत. यामध्ये 10 व्या शतकातील बलुआ दगडामध्ये कोरलेली मूर्ती, 12 व्या शतकातील 8.5 सेमी उंच कांस्यची नटराज मूर्ती आहे. 

७५ टक्के कलाकृती माेदी सरकारच्या काळात परतयापूर्वीही ३६ कलाकृती अमेरिकेने भारताला परत केल्या हाेत्या, तर ऑस्ट्रेलियानेही १४ कलाकृती भारताच्या स्वाधीन केल्या हाेत्या. १९७६ पासून ५४ कलाकृती परत केल्या आहेत. त्यापैकी ७५ टक्के वस्तू माेदी सरकारच्या काळात परत मिळाल्या आहेत. लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णू, शिवपार्वती, २४ जैन तीर्थंकर, आदींच्या प्राचीन मूर्ती अमेरिकेने भारताकडे साेपविल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका