'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:24 IST2026-02-22T15:21:40+5:302026-02-22T15:24:22+5:30

'एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता; तो एक राष्ट्रीय कार्यक्रम होता. जगभरातील 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले होते.'

PM Modi strongly criticizes Congress protest at AI Summit | 'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका

'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली-मेरठ ‘नमो भारत’ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) च्या संपूर्ण 82 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर आयोजित जनसभेत त्यांनी AI Impact Summitदरम्यान काँग्रेसने केलेल्या ‘शर्टलेस’ आंदोलनावर तीव्र शब्दांत टीका केली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

AI समिटवरील काँग्रेसच्या आंदोलनावर टीका

पंतप्रधान मोदी म्हणाले, एकीकडे, देशवासी भारताच्या विकासासाठी दिवसरात्र काम करत आहेत, परंतु देशात असे काही राजकीय पक्ष आहेत जे भारताचे यश पचवू शकत नाहीत. एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता; तो एक राष्ट्रीय कार्यक्रम होता, राष्ट्रीय सन्मानाचा कार्यक्रम होता. जगभरातील 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी दिल्लीला आले असताना, काँग्रेसने भारताच्या एका जागतिक कार्यक्रमाला राजकीय आखाडा बनवले, असा आरोप त्यांनी केला.

परदेशी पाहुण्यांसमोर कपडे काढून निषेध करणे, ही काँग्रेसची नग्न आणि घाणेरड्या राजकारणाची पातळी दाखवते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आज संपूर्ण देश काँग्रेस पक्षाच्या धोरणांचा निषेध करत आहे, पण दुर्दैवाने... लाज वाटण्याऐवजी, इतक्या जुन्या पक्षाचे नेते निर्लज्जपणे बढाई मारत आहेत. देशाला माहित आहे की, तुम्ही आधीच नग्न आहात, मग तुमचे कपडे काढण्याची गरज का होती? असा बोचरा सवालही पीएम मोदींनी केला.

एकाच दिवशी ‘नमो भारत’ आणि मेट्रोचा शुभारंभ

मेरठमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी सांगितले, आज पहिल्यांदाच एकाच मंचावरून नमो भारत रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा यांचा एकाच दिवशी शुभारंभ होत आहे. विकसित भारतातील कनेक्टिव्हिटी कशी असेल, याची ही झलक आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी मेट्रो आणि ट्विन सिटी व्हिजनला गती देण्यासाठी नमो भारतसारखी आधुनिक ट्रेन हे काम उत्तर प्रदेशात होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

आमची कार्यसंस्कृती, सुरुवात ते शेवट...

पंतप्रधानांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर भर देताना म्हटले, ज्या कामाचा शिलान्यास होतो, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतो. म्हणूनच आता प्रकल्प पूर्वीसारखे लटकत नाहीत. सराय काले खाँ, आनंद विहार, गाझियाबाद आणि मेरठ येथे रेल्वे, मेट्रो आणि बस टर्मिनल्सचे एकत्रीकरण झाले आहे. देशात प्रथमच एकाच स्टेशनवर, एकाच ट्रॅकवर नमो भारत आणि मेट्रो धावणार आहेत. म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवरून शहरांतर्गत आणि थेट दिल्लीकडेही प्रवास शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा; महिला शक्तीचे नेतृत्व

पूर्वीच्या स्थितीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, कधीकाळी संध्याकाळ झाली की या मार्गावर शांतता पसरायची, भीतीचे वातावरण असायचे. आता कायदा-सुव्यवस्था सुधारली असून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळतो आहे. ‘नमो भारत’ हे नारीशक्तीचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की ट्रेन ऑपरेटर, स्टेशन कंट्रोल स्टाफसह अनेक जबाबदाऱ्या महिला कर्मचारी सांभाळत आहेत.

मेट्रो नेटवर्कमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर

आज मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे, असे सांगत पंतप्रधानांनी यूपीतील मेरठसह अनेक शहरांत मेट्रोचे काम सुरू असल्याचे नमूद केले.गेल्या 11 वर्षांत मेट्रो अनेक शहरांपर्यंत पोहोचली, कारण भाजप सरकार नागरिकांना सुविधा देण्यावर भर देते, असेही ते म्हणाले.

Web Title : पीएम मोदी ने एआई समिट में कांग्रेस के 'शर्टलेस' विरोध की आलोचना की

Web Summary : पीएम मोदी ने एआई शिखर सम्मेलन के दौरान कांग्रेस के 'शर्टलेस' विरोध की आलोचना करते हुए इसे 'गंदी राजनीति' करार दिया। उन्होंने दिल्ली-मेरठ आरआरटीएस का उद्घाटन किया, बेहतर कनेक्टिविटी, कानून व्यवस्था और महिला नेतृत्व पर प्रकाश डाला। भारत अब मेट्रो नेटवर्क में विश्व स्तर पर तीसरे स्थान पर है।

Web Title : PM Modi Slams Congress' 'Shirtless' Protest at AI Summit

Web Summary : PM Modi criticized Congress' 'shirtless' protest during the AI Summit, calling it 'dirty politics.' He inaugurated the Delhi-Meerut RRTS, highlighting improved connectivity, law and order, and women's leadership. India is now third globally in metro networks.