शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:15 IST

Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमानअपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे एक प्रवासी विमान होते.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानाला उड्डाणादरम्यान अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे हे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

विमान दुर्घटनेचे महत्त्वाचे अपडेट्स

- एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर ७८७ विमान- दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण- उड्डाणानंतर काहीच मिनिटांत रहिवासी भागावर कोसळलं विमान- विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरलेल्या असल्याने जास्त नुकसान- दुर्घटना परिसरातील अनेक वाहनं जळून खाक- विमान दुर्घटनेमुळे परिसरातील इमारतीही कोसळल्या- अहमदाबाद अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

विमान कोसळतानाचे दृष्य कॅमेरात कैद

सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील एका निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आहे. या हृदयद्रावक घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानAccidentअपघातGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद